रक्कमेच्या व्याजातून दरवर्षी एक दिवस आपल्या इच्छित तिथीस वा तारखेस समर्थ समाधीस अभिषेक, नैवेद्य व संपूर्ण अन्नदान होऊन आपणांस प्रसाद व अंगारा पाठविला जातो
फाल्गुन अमावास्या, आषाढ शु. दशमी, भाद्रपद अमावास्या, माघ पौर्णिमा व माघ अमावास्या या पाच तिथींना गडावर उद्वार्चन विधी होतो. श्रीसमर्थांनी पाच दिवस रामरायाची स्वहस्ते पूजा केली होती. त्याच श्रीरामपंचायतन मूर्तींना वरील पाच तिथीस पंचामृती पूजा व पवमान अभिषेक केला जातो. वरील रक्कमेच्या व्याजातून आपल्या नावे हा धार्मिक कार्यक्रम होऊन प्रसाद पाठविला जाईल
आयकर कलम 80G (2B) प्रमाणे श्रीराम व श्रीसमर्थ समाधी मंदिर आणि श्रीरामदासस्वामींचा मठ यांच्या जीर्णोद्धारासाठी दिलेल्या देणग्या आयकरातून सूट मिळण्यास पात्र आहेत
जनता सहकारी बँक, चिंचवड गांव, पुणे येथे संस्थानचे सेव्हिंग्ज खाते क्र. ००९२२०१०००४६५५४ आहे. कोणत्याही बँक खात्यावरून अगर मोबाईलद्वारे देणगी रक्कम संस्थानच्या सदर खात्यावर जमा करता येईल. त्यासाठी आपले खाते ज्या बँकेत असेल त्या बँकेच्या पद्धतीनुसार कार्यवाही करावी. यासाठी संस्थानचा मोबाईल क्रमांक ९४२३०३४११२ आणि एम.आय.डी. क्र. ९०७४००१ आहे
सेवा प्रकारांच्या अधिक माहितीसाठी संस्थानच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. वरीलपैकी कोणत्याही एका अगर अधिक सेवांमध्ये सहभागी होऊन श्रीसमर्थ सेवेचा लाभ घ्यावा, हि विनंती