- शिबिरात सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या समर्थभक्त साधकांना या ऑनलाईन पूर्वप्रवेश प्रक्रियेद्वारे नोंदणी करणे अत्यावश्यक. नोंदणी न केलेल्या इच्छुकांना प्रवेश देण्यात येणार नाही.
- नोंदणीनंतर प्रवेश निश्चित झालेल्या साधकांना गडावरून संपर्क साधला जाईल. कृपया संपर्क झालेल्यानंतरच आपला प्रवेश निश्चित समजावा.
- सर्व शिबिरार्थींनी दिनांक ९ मे रोजी सायंकाळी ४ पर्यंत गडावर पोचावे. त्याच दिवशी सायंकाळी ७ नंतर शिबिराचे प्रथम सत्र होईल.
- कृपया आपले आधार कार्ड किंवा वोटर आयडी कार्ड सोबत ठेवावे. निवास, भोजन आदी व्यवस्थेच्या संदर्भाने ज्या सूचना दिल्या जातील त्याचे काटेकोर पालन अपेक्षित आहे.
- कृपया पांघरूण, शाल, नियमित औषधे सोबत आणावीत. काही आजार वगैरे असल्यास कृपया शिबिरात सहभागी होऊ नये. गडाच्या भौगोलिक परिस्थितीनुसार गडावर वैद्यकीय सेवेची त्वरित उपलब्धता नाही याची कृपया नोंद घ्यावी.
- येताना दासबोधाची प्रत, मनाच्या श्लोकांचे पुस्तक, वही, पेन सोबत आणावे. दासबोध ग्रंथ व मनाच्या श्लोकांची पुस्तिका गडावर विक्रीस उपलब्ध आहे.
- सज्जनगड हे पर्यटनस्थळ नसून अध्यात्मिक केंद्र आहे. आपण समर्थभक्त साधक आहोत, यास अनुरूप आचरण असावे. सज्जनगडाच्या अध्यात्मिक पावित्र्याची सर्वांकडून जपणूक व्हावी