संस्थान

सदुपासना सत्कर्म । सत्क्रिया आणि स्वधर्म ।
सत्संग आणि नित्यनेम । निरंतर ।।

rss-hero-content-bottom-img
vyav-home-img

योजना

श्रीसमर्थ रामदासस्वामी पुरस्कार योजना
१)पुरस्कार उद्देश- रामदासी संप्रदायाच्या विचारांच्या / कार्याच्या प्रसाराचे कार्य केलेल्या किंवा करणाऱ्या व्यक्ती अथवा संस्था यांचा गौरव करणे.
२)पुरस्काराचे नाव- श्रीरामदासस्वामी पुरस्कार

३)पुरस्काराचे स्वरूप

  • रोख किंवा डिमांड ड्राफ्ट स्वरूपात रुपये २१,०००/- ( रुपये एकवीस हजार फक्त )
  • स्मृतीचिन्ह
  • गौरवपत्र

४)रामदासी संप्रदायाच्या प्रसारकार्याचे स्वरूप

  • संप्रदायासंबंधी संशोधन
  • संप्रदायासंबंधी लेखन
  • समर्थ रामदासस्वामी यांचे कार्य, तत्त्वज्ञान, इत्यादी बद्दल लेखन
  • संप्रदायातील वाड्मयाबद्दल लेखन
  • संप्रदायाच्या प्रसारासाठी कीर्तन, व्याख्याने, संघटना बांधणी, संघटना अगर केंद्र चालवणे, इत्यादी

५)पात्रता

  • रामदासी संप्रदायाच्या प्रसाराचे कार्य केलेल्या किंवा करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्था
  • संस्था असल्यास संस्थेची सार्वजनिक न्यास नोंदणी कायदा आगर तत्सम कायद्याखाली नोंदणी झाली असली पाहिजे.
  • कोणासही व्यक्ती अगर संस्थेचे नाव लेखी स्वरूपात सुचवता येईल.
६)पुरस्कारासाठी निवड – पुरस्कारासाठी व्यक्ती अगर संस्था निवड करण्याचा संपूर्ण अधिकार श्रीरामदास स्वामी संस्थानच्या विश्वस्तांना राहील.
७)पुरस्कार दरवर्षी ( १ एप्रिल ते ३१ मार्च ) दिला जाईल.
८)पुरस्कारासाठी विहित नमुन्यात माहिती पाठवावी लागते.
९)पुरस्कार प्रदान कार्यक्रम सज्जनगड, सातारा किंवा अन्य जागी आयोजित केला जाईल.
१०)या योजनेबाबत काही तक्रार अगर शंका निर्माण झाल्यास त्याबाबतचा अंतिम निर्णय श्रीरामदासस्वामी संस्थानच्या विश्वस्त मंडळचा मानला जाईल.
११)वरील नियमात पूर्व सूचनेशिवाय बदल करण्याचा अधिकार श्रीरामदासस्वामी संस्थानच्या विश्वस्त मंडळास राहील.
rss-contact-bottom-img
Language