सज्जनगड

आकल्प सह्याद्रिशिखरस्थान । समर्थस्वामींचे अधिष्ठान ।
संतसज्जन सुख स्वानंदघन । आनंदे उच्छाह करिताती ॥

rss-hero-content-bottom-img
itihas-home-img

कसे पोहचाल

( विविध शहर ते सज्जनगड अंतर )

श्रीसमर्थांच्या वास्तव्याने पुनीतपावन झालेला सज्जनगड! या स्थळाला महाराष्ट्रीय इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व आहे. स्वराज्याची धार्मिक राजधानी अशी ओळख लाभलेला सज्जनगड सर्वांचे श्रद्धास्थान आहे. दरवर्षी अनेक भाविक महाराष्ट्रासह देश विदेशातून गडावर श्रीसमर्थांचे दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी येत असतात.


गडावर येण्यासाठी सातारा शहर हे महत्त्वाचे मध्यवर्ती केंद्र आहे. साताऱ्यापर्यंत येण्यासाठी देशातील विविध शहरातून रस्ते, तसेच रेल्वेची उत्तम सोय आहे. मुंबईहून येण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग ४ या रस्त्याने पुणे मार्गे येता येते. कोकणातून येण्यासाठी कोल्हापूर मार्गे येऊन साताऱ्यात राष्ट्रीय महामार्ग ४नेच पोहोचता येते. मराठवाडा, विदर्भातून साताऱ्यात येण्यासाठी सोलापूर व पुणे असे दोन मार्ग आहेत. सोलापूर मार्गे येताना पंढरपूर, गोंदवले मार्गे साताऱ्यात येता येते.


साताऱ्यात आल्यावर बस स्टँडवरून दर तासाला सज्जनगड एसटीची सोय राज्य परिवहन महामंडळाने केली आहे. हि बस गडाच्या पायथ्याशी असलेल्या वाहनतळापर्यंत (भातखळा) येते. रेल्वेने आल्यास सातारा रेल्वे स्थानकावरून रिक्षा अथवा एसटीने स्टँडवर येऊन तेथून पुढे सातारा-सज्जनगड बसने गडावर पोहोचता येते.

rss-contact-bottom-img
Language