समर्थ

रामदास रामदास । हाचि सदा निदिध्यास ।
लागावा तो रात्रंदिस । आपुल्या मना ।।

rss-hero-content-bottom-img
charitra-home-img

चरित्र

श्रीसमर्थ रामदासस्वामींच्या जीवनातील ठळक घटना

१६०८ श्रीरामनवमीच्या दिवशी जांब (जि. जालना) येथे जन्म
१६१३ जांब येथेच समर्थांची मुंज
१६१६ बालपणीच रामरायाने दर्शन व अनुग्रह दिला
१६२० स्वतःच्या विवाह मंडपातून बारा वर्षीय नारायणाने पलायन केले
१६२० नाशिक शहरातील टाकळी येथील गोदावरी नदी किनारी १२ वर्षे तपश्चर्या
१६३१ समर्थ व छ. शहाजीराजे यांची टाकळी येथे भेट
१६३२ भारत भ्रमण करून देशाच्या सामाजिक परिस्थितीचे निरीक्षण
१६४४ महाबळेश्वरला आगमन. राजकीय, सामाजिक व आध्यात्मिक कार्यास प्रारंभ
१६४४ शहापूर येथे मारुती स्थापना व मसूर येथे रामनवमी उत्सव सुरु
१६४८ अंगापूरच्या डोहात सापडलेल्या राममूर्तीची चाफळ येथे स्थापना व चाफळ येथेच पहिल्या मठाची व संप्रदायाची स्थापना
१६४९ श्रीसमर्थ व संत तुकाराम यांची चिंचवड येथे भेट
१६४९ छत्रपती शिवाजीराजे व श्रीरामदासस्वामी यांची चाफळ जवळ शिंगणवाडीला प्रथम भेट व अनुग्रह
१६५४ शिवथरघळीत दासबोध लेखनास प्रारंभ
१६५३ छत्रपती शिवाजी महाराजांनी समर्थांच्या झोळीत राज्य अर्पण केले
१६७३ छत्रपती शिवाजी महाराजांनी परळीचा किल्ला (सज्जनगड) आदिलशहाकडून जिंकुन घेतला
१६७६ छत्रपती शिवाजी महाराजांच्या विनंतीवरून सज्जनगडावर समर्थ कायम वास्तव्यास आले
१६७९ समर्थशिष्या संत वेणास्वामीनी कीर्तन करता करता समर्थचरणी देह ठेवला
१६८० रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचे महानिर्वाण
१६८१ समर्थांनी सज्जनगडावरून छत्रपती संभाजीराजेंना ऐतिहासिक पत्र लिहिले
१६८१ तंजावर येथून राम, लक्ष्मण, सीतामाई आणि मारुतीराय या मूर्तीचे आगमन
१६८२ पूर्वसूचना देऊन सज्जनगडावरच मठात समर्थांनी देह ठेवला
१६८२ छत्रपती संभाजी महाराजांनी श्रीसमर्थांचे समाधी मंदिर बांधले

गिरीधरस्वामीकृत श्रीसमर्थप्रताप

समर्थहृदय शं.श्री.देवकृत समर्थावतार

rss-contact-bottom-img
Language