पाच पंचामृती महापूजा कायमनिधी – ₹३००१

फाल्गुन अमावास्या, आषाढ शु. दशमी, भाद्रपद अमावास्या, माघ पौर्णिमा व माघ अमावास्या या पाच तिथींना गडावर उद्वार्चन विधी होतो. श्रीसमर्थांनी पाच दिवस रामरायाची स्वहस्ते पूजा केली होती. त्याच श्रीरामपंचायतन मूर्तींना वरील पाच तिथीस पंचामृती पूजा व पवमान अभिषेक केला जातो. वरील रक्कमेच्या व्याजातून आपल्या नावे हा धार्मिक कार्यक्रम होऊन प्रसाद पाठविला जाईल

नंदादीप कायमनिधी – ₹१५०१

रक्कमेच्या व्याजाचा विनियोग समाधी मंदिरातील नंदादीपासाठी केला जातो व आपणांस दरवर्षी दासनवमीस प्रसाद व अंगारा पोस्टाने पाठविला जातो

नैमित्तिक धार्मिक विधी – ₹२५०१

प्रतिवर्षी आपल्या इच्छित तिथीस वा तारखेस श्रीसमर्थ समाधीस अभिषेक, नैवेद्य व सवाष्ण ब्राह्मण भोजन होऊन आपणांस प्रसाद व अंगारा पोस्टाने पाठविला जाईल

Language