शिबिर

शाहाणे करावे जन। पतित करावें पावन।
सृष्टीमध्ये भगवद्भजन। वाढवावे।।

rss-hero-content-bottom-img

श्रीदासबोध अभ्यास शिबिर

वय मर्यादा : १८ ते ६५ वर्षे
पुरुष - पांढरा कुर्ता/बंडी व पायजमा
महिला - पांढरी सलवार, पांढरी कुर्ती व ओढणी किंवा साडी

नियम व सूचना :

  1. शिबिरात सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या समर्थभक्त साधकांना या ऑनलाईन पूर्वप्रवेश प्रक्रियेद्वारे नोंदणी करणे अत्यावश्यक. नोंदणी न केलेल्या इच्छुकांना प्रवेश देण्यात येणार नाही.
  2. नोंदणीनंतर प्रवेश निश्चित झालेल्या साधकांना गडावरून संपर्क साधला जाईल. कृपया संपर्क झालेल्यानंतरच आपला प्रवेश निश्चित समजावा.
  3. सर्व शिबिरार्थींनी दिनांक ९ मे रोजी सायंकाळी ४ पर्यंत गडावर पोचावे. त्याच दिवशी सायंकाळी ७ नंतर शिबिराचे प्रथम सत्र होईल.
  4. कृपया आपले आधार कार्ड किंवा वोटर आयडी कार्ड सोबत ठेवावे. निवास, भोजन आदी व्यवस्थेच्या संदर्भाने ज्या सूचना दिल्या जातील त्याचे काटेकोर पालन अपेक्षित आहे.
  5. कृपया पांघरूण, शाल, नियमित औषधे सोबत आणावीत. काही आजार वगैरे असल्यास कृपया शिबिरात सहभागी होऊ नये. गडाच्या भौगोलिक परिस्थितीनुसार गडावर वैद्यकीय सेवेची त्वरित उपलब्धता नाही याची कृपया नोंद घ्यावी.
  6. येताना दासबोधाची प्रत, मनाच्या श्लोकांचे पुस्तक, वही, पेन सोबत आणावे. दासबोध ग्रंथ व मनाच्या श्लोकांची पुस्तिका गडावर विक्रीस उपलब्ध आहे.
  7. सज्जनगड हे पर्यटनस्थळ नसून अध्यात्मिक केंद्र आहे. आपण समर्थभक्त साधक आहोत, यास अनुरूप आचरण असावे. सज्जनगडाच्या अध्यात्मिक पावित्र्याची सर्वांकडून जपणूक व्हावी
Language