संस्थान

सदुपासना सत्कर्म । सत्क्रिया आणि स्वधर्म ।
सत्संग आणि नित्यनेम । निरंतर ।।

rss-hero-content-bottom-img
vyav-home-img

जीर्णोद्धार

देवस्थानचे व्यवस्थापन इ.स.१९३२ ते १९८७ पर्यंत कलेक्टर व कोर्ट ऑफ वॉर्डस् यांच्या ताब्यात होते. या कालावधीत कलेक्टर व कोर्ट ऑफ वॉर्डस् यांची परवानगी घेऊन सज्जनगड सुधारणा मंडळ व नंतर श्रीसमर्थ सेवा मंडळाने जीर्णोद्धाराची कामे सुमारे १९७५ पर्यंत केली.

श्रीसमर्थ समाधी मंदिर व सज्जनगडावरील इतर सर्व मंदिराचा ताबा सहाय्यक धर्मादाय आयुक्त यांचे आदेशाने सन २००० साली संस्थानकडे पुन्हा आला. तेथपासून प्रामुख्याने जीर्णोद्धाराची खालील कामे झाली.

 1. श्रीसमर्थ समाधी मंदिरात संगमरवर फरशी बसवण्यात आली – रु १५ लाख
 2. श्रीसमर्थ मठातील गळती काढणे . फरशी बसविणे – रु १० लाख
 3. भक्तांसाठी श्रीसमर्थ महाप्रसादगृह बांधणी – रु ३० लाख
 4. भक्तांच्या निवासासाठी ‘ आनंदवन भवन ’ , आणि समर्थ शिष्या ‘ आक्कास्वामी स्मृती ’ या अद्ययावत इमारती बांधण्यात आल्या आहेत. – रु २ कोटी
 5. महाराष्ट्र शासनाच्या सहयोगाने सज्जनगड संस्थान पाणी पुरवठा योजना – रु १ कोटी ४३ लाख
 6. वेदपाठशाळा नवीन बांधकाम – रु २० लाख
 7. गोशाळा निर्मिती – रु १० लाख
 8. श्रीसमर्थ स्थापित धाब्याचा मारुती मंदिर पुनर्बांधणीसाठी स.भ.भाई वांगडे यांचे योगदान लाभले.
 9. अंग्लाई देवी मंदिर पुनर्बांधणीसाठी श्रीसमर्थ स्थापित प्रसिद्ध ११ मारुती पैकी मनपाडळे येथील मारुती
  देवस्थान व्यवस्थापक कुटुंबापैकी स.भ.श्री अनिल रामदासी यांचे योगदान लाभले . सन २०१५
 10. श्रीसमर्थ समाधी मंदिराचे क्षती पावलेल्या शिखराचे नूतनीकरण करण्यात आले.
 11. कल्याण उडी स्मारक पुनर्बांधणी – रु १० लाख
 12. पेठेतील मारुती मंदिर शिखर पुनर्बांधणी – रु १० लाख
 13. वाहनतळासाठी ५ एकर जागा खरेदी करून प्रशस्त वाहनतळ
 14. .सज्जनगडावर येणाऱ्या यात्रेकरुंच्या सुरक्षिततेसाठी रेलींग व पद्पथाचे बांधकाम झाले आहे.
 15. .सज्जनगडावर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करून वृक्षांचे संवर्धन करण्यात येत आहे.
 16. भक्तांसाठी स्वच्छतागृह संकुल उभारणी.
 17. भक्तांच्या निवासी इमारतीचे वर सौरऊर्जा उपकरणे बसवून भक्तांसाठी गरम पाण्याची सोय.
rss-contact-bottom-img
Language