असते. मा.जिल्हा न्यायाधीश सातारा यांनी संस्थानच्या व्यवस्थापनेसाठी घटना तयार केली आहे. सदर घटनेप्रमाणे मा.जिल्हा न्यायाधीश विश्वस्तांची नेमणूक ६ वर्षासाठी करतात. संस्थानचा कारभार योग्य प्रकारे चालावा म्हणून वार्षिक अंदाजपत्रक, ऑडिट झालेली जमाखर्चाची पत्रके व वार्षिक अहवाल मा. जिल्हा न्यायाधीशांना सादर करणे इ. तरतुदी संस्थानच्या घटनेत असून घटनेतील तरतुदींची पूर्तता केली जाते.