संस्थान

सदुपासना सत्कर्म । सत्क्रिया आणि स्वधर्म ।
सत्संग आणि नित्यनेम । निरंतर ।।

rss-hero-content-bottom-img
vyav-home-img

सेवा

श्रीसमर्थ समाधी मंदिरात वर्षभर विविध प्रसंगी कीर्तन, प्रवचन, गायन, वादन, इत्यादी सेवा संपन्न होतात. अनेक मान्यवर श्रीक्षेत्र सज्जनगडावर येऊन आपली सेवा श्रीसमर्थ दरबारात समर्थचरणी रुजू करतात. यात प्रामुख्याने दासनवमी महोत्सव, गुरुपौर्णिमा उत्सव, अशा प्रसंगी या सेवा होतात. त्याच बरोबर इतर दिवशी देखील वर्षभर भक्तांना आपली सेवा श्रीसमर्थ चरणी सादर करण्याची संधि उपलब्ध करून देण्यात येते. यासाठी संस्थानने दररोज दुपारी २ ते ५ हि वेळ आरक्षित करून ठेवलेली आहे. यासाठी ईमेल, समक्ष भेटून, पोस्ट अथवा कुरियरद्वारे अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज सादर केल्यानंतर आपल्या अर्जाची शहनिशा करून ही सेवा आयोजित करण्यात येते व तसा संपर्क साधण्यात येतो. सेवा नियोजित करण्याचा अधिकार सर्वस्वी संस्थानच्या व्यवस्थापनाचा राहील.
rss-contact-bottom-img
Language