रामदास रामदास । हाचि सदा निदिध्यास । लागावा तो रात्रंदिस । आपुल्या मना ।।
चित्रमय चरित्र
श्रीसूर्यनारायणाचे सुर्याजीपंत व राणूबाई यांना ब्राह्मण रुपात दर्शन व पुत्रप्राप्तीचे वरदान. तद्नुसार गंगाधर व नारायण यांचा जन्म.
बाळ नारायण एकदा अडगळीच्या खोलीत जाऊन ध्यानमग्न होऊन बसला. आईने घरभर शोधल्यावर तो या खोलीत सापडला. आईने इथे काय करतो
असे विचारताच नारायण म्हटला, 'आई ! चिंता करितो विश्वाची !'
टाकळी येथे अनुष्ठानकाळात पहिल्या मठाची स्थापना व मठांमधून
सुदृढ समाज घडविण्याच्या हेतूने मारुतीरायाची स्थापना व बलोपासनेचे धडे.
टाकळी येथे समर्थांचे पुरश्चरण सुरू असताना श्रीशहाजी राजे भोसले यांनी त्यांची भेट घेतली.
श्रीसमर्थशिष्या वेण्णास्वामी यांना समर्थांनी सज्जनगडावरील मठात भोजन प्रसंगी श्रीमारुतीरायाच्या रुपात दर्शन दिले.
चिंचवड गावी मंगलमूर्ती वाडयात श्रीसमर्थ, श्रीमोरया गोसावी महासाधू व श्रीसंत तुकाराम महाराज यांची भेट
अंगापूर येथे कृष्णेच्या डोहातून श्रीरामराय व श्रीमहिषासुरमर्दिनी देवीची मूर्ती मिळाली. श्रीरामरायाची चाफळ येथे भव्य देवालय उभारून स्थापना व श्रीमहिषासुरमर्दिनी देवीची सज्जनगडी स्थापना
चाफळ जवळील सिंगणवाडीच्या बागेत श्रीछत्रपती शिवाजी महाराजांना अनुग्रह
शिष्योत्तम श्रीकल्याणस्वामी उर्वशी नदीच्या पत्रातून दोन मोठे हंडे भरून
पाणी गडावर आणत. कृष्णेच्या पुरात समर्थांना आपल्या खांद्यावर
घेऊन नदी पार केली.
एकदा समर्थ व कल्याणस्वामी सज्जनगडाच्या कड्यावरून फिरत असता समर्थांची छाटी उडाली. समर्थ उद्गारले, 'कल्याणा! छाटी उडाली!'
हे ऐकताच क्षणाचा हि विलंब न करता कल्याणस्वामींनी छाटी पकडायला
गडाच्या कड्यावरून उडी मारली.
श्रीसमर्थांनी घेतलेली आपल्या शिष्यांची परीक्षा. पळा! पळा! ब्रह्मपिसा येतो जवळी!
श्रीसमर्थांनी घेतलेली आपल्या शिष्याची परीक्षा. श्रीसमर्थशिष्य भोळारामाची सद्गुरूनिष्ठा.
वेदशास्त्रसंपन्न षट्शास्त्र पारंगत श्रीसदाशिवशास्त्री येवलेकर उर्फ वासुदेव गोसावी यांचे गर्वहरण व अनुग्रह कृपा.
श्रीसमर्थशिष्या वेण्णास्वामी यांना समर्थांनी सज्जनगडावरील मठात भोजन प्रसंगी श्रीमारुतीरायाच्या रुपात दर्शन दिले.
शरण हि वेणा आत्माराम, पावली पूर्णविराम! श्रीसमर्थशिष्या वेण्णास्वामी यांचा महानिर्वाण प्रसंग.
श्रीव्यंकोजीराजे भोसले तंजावरकर यांच्या दरबारी अंध मूर्तीकारावर कृपा करून त्याच्या करवी श्रीरामपंचायतनाची निर्मिती
सज्जनगडावर तंजावरहुन आलेल्या श्रीराममूर्तीं समोर बसून माघ वद्य नवमीस महासमाधी
श्रीसमर्थांचे समाधीतून प्रकट होऊन श्रीकल्याणस्वामी यांना सदेह दर्शन.
श्रीसमर्थांच्या इच्छेनुसार त्यांच्या वंशजांना जांबेहून बोलावून
श्रीसमर्थस्थापित संस्थानचा कार्यभार श्रीछत्रपती शाहू महाराज यांनी त्यांच्यावर सोपवला. येथून संस्थानच्या अधिकारीस्वामी पदाची सुरुवात झाली.