सज्जनगड

आकल्प सह्याद्रिशिखरस्थान । समर्थस्वामींचे अधिष्ठान ।
संतसज्जन सुख स्वानंदघन । आनंदे उच्छाह करिताती ॥

rss-hero-content-bottom-img
itihas-home-img

वार्षिक धार्मिक कार्यक्रम

सज्जनगडावरील देवस्थानामध्ये होणारे वार्षिक धार्मिक कार्यक्रम
जयंत्या पर्वे मोहोत्साव । असंभाव्य चालवी वैभव ।
जें देखतां स्वर्गींचे देव । तटस्त होती ।।
श्रीसमर्थवंशजांकडे संस्थानची धुरा इ.स. १७१० साली आल्यापासून नित्याने सुरु असलेले धार्मिक कार्यक्रम.
गेली ३१० वर्षे हे कार्यक्रम अव्याहतपणे सुरू आहेत.

१. गुढीपाडवा (चैत्र शु. प्रतिपदा)

– श्रीसमर्थ समाधीस उटणे लावून अभ्यंगस्नान घालून पूजा
– गुढी उभारणी व पंचांग वाचन व पूजन

२. श्रीरामनवमी (चैत्र शु. नवमी)

– श्रीसमर्थ समाधी मंदिरास श्रीसमर्थ रचित आरत्या म्हणत भाविकांसह तेरा प्रदक्षिणा घातल्या जातात.
– मंदिरात श्रीराम व श्रीसमर्थ जन्म आख्यान प्रवचन
– श्रीराम व श्रीसमर्थ पाळणा गायन
– सुंठवडा प्रसाद वाटप.

३. हनुमान जयंती (चैत्र पौर्णिमा)

– पेठेतील मारुती मंदिरात जन्मकाळाचे भजन
– श्रीमारुतीची षोडोषोपचार पूजा
– श्रीहनुमान जन्माचा पाळणा

४. श्रीवेण्णास्वामी पुण्यतिथी (चैत्र कृ. चतुर्दशी)

५. अक्षय तृतीया (वैशाख शु. तृतीया)

– श्रीसमर्थ समाधीस गंधलेपन
– श्रीसमर्थ समाधी गाभाऱ्यात श्रीमत दासबोधातील पादसेवन भक्ती समास वाचन
– शिवजयंती – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून, दीप प्रज्वलन व जयघोष केला जातो.

६. श्रीनरसिंह जयंती (वैशाख शु. चतुर्दशी)

मंदिरास आंब्याचे तोरण

७. दशहरा (ज्येष्ठ शु. प्रतिपदा)

गंगा पूजन प्रारंभ

८. दशहरा समाप्ती (ज्येष्ठ शु.दशमी)

गंगा पूजन प्रारंभ

९. उद्वार्चन (आषाढ शु.दशमी)

– श्रीसमर्थ पूजित श्रीराम पंचायतनास पवमान अभिषेक सकाळी ८-०० वा.
– श्रीसमर्थ स्थापित राम पंचायतन मूर्तीना पिठीसाखर लावून स्नान घातले जाते.
– श्रीसमर्थ समाधी पूजन – सकाळी १०-०० वा.

१०. आषाढी एकादशी (आषाढ शु. एकादशी) चातुर्मासारंभ

– श्रीसमर्थ मंदिरात संप्रदायिक भजन
– सज्जनगड प्रदक्षिणा दिंडी
– श्रीराम मंदिरात नाथमहाराजांचे भावार्थ रामायण वाचन दर एकादशीला (पूर्ण चातुर्मासात)

११. श्रीसमर्थशिष्य कल्याणस्वामी पुण्यतिथी (आषाढ शु. त्रयोदशी)

– कल्याण छाटी स्मारकातील कल्याण स्वामींच्या मूर्तीस रुद्राभिषेक

१२. महाराष्ट्रीय बेंदूर (आषाढ शु. चतुर्दशी)

१३. गुरुपौर्णिमा (आषाढ शु. पौर्णिमा)

– श्रीसमर्थ समाधीस विशेष अभिषेक व महापूजा
– श्रीसमर्थ समाधीसमोर भजन / गायन सेवा
– श्रीसमर्थ संप्रदायाचा अनुग्रह घेण्याची व्यवस्था

१४. श्रीसमर्थ समाधीस महारुद्र अनुष्ठान (श्रावण शु. प्रतिपदा ते अमावस्या)

– श्रीसमर्थ समाधीस रुद्र आवर्तन व अभिषेक
दरवर्षी श्रावण मासानिमित्त श्रीसमर्थ समाधीस महारुद्र अभिषेकाचे अनुष्ठान केले जाते. महिनाभर रोज चार एकादशण्या (रुद्राची चव्वेचाळीस आवर्तने) होतात. अशा पद्धतीने संपूर्ण श्रावण महिन्यात १३३१ रुद्राची आवर्तने करून एक महारुद्र पूर्ण केला जातो.
– पेठेतील मारुतीची पूजा व रुद्रानुष्ठान

१५. नागपंचमी (श्रावण शु. पंचमी)

नागमूर्ती पूजन

१६. नारळी पौर्णिमा (श्रावण शु. पौर्णिमा)

१७. कृष्ण जन्माष्टमी (श्रावण कृ. अष्टमी)

– गोकुळ पूजन
– श्रीमत् भगवत् गीता पठण – रात्री – १०-०० वा
– भजन व पाळणा
– श्रावण कृ. नवमी – श्रीसमर्थ समाधीस दुधाचा अभिषेक

१८. हरतालिका पूजन (भाद्रपद शु.तृतीया)

१९. गणेशोत्सव (भाद्रपद शु. चतुर्थी ते गणेश व गौरी विसर्जन)

– मंदिरातील वरील सभामंडपामध्ये पार्थिव गणेश पूजन
– श्रीगणपती अथर्वशिर्षाची सहस्रावर्तने
– श्रीसमर्थ मठात गौरी आवाहन व पूजन
– गणेश याग – सहस्र मोदक, दुर्वा हवन
– सायंकाळी श्रीसमर्थ समाधी मंदिरातील गणेश मूर्तीसह सज्जनगडावरील गावकऱ्यांकडील गणेश मूर्तीसह मिरवणूकीने गणेश विसर्जन

२०. उद्वार्चन (भाद्रपद अमावस्या)

– श्रीसमर्थ पूजित श्रीराम पंचायतनास पवमान अभिषेक सकाळी ८-०० वा.
– श्रीसमर्थ स्थापित राम पंचायतन मूर्तीना पिठीसाखर लावून स्नान घातले जाते.
– श्रीसमर्थ समाधी पूजन – सकाळी १०-०० वा

२१. नवरात्रोत्सव (अश्विन शु.प्रतिपदा)

– श्रीसमर्थ स्थापित अंगाई देवी मंदिर येथे श्री अंगाई देवीस अभिषेक व घटस्थापना
– सप्तशती पाठरंभ – (९ दिवसात ९ पाठ केले जातात.)
– प्रतिदिन रात्री – अंगाई देवी मंदिरात संप्रदायिक भजन सेवा

२२. नवरात्रोत्सव समाप्ती (अश्विन शु. नवमी)

नवचंडी याग

२३. दसरा (अश्विन शु. दशमी)

– श्रीसमर्थ समाधी व श्रीअंगाई देवी मंदिरास सुशोभीकरण
– श्रीसमर्थ मठात आयुध (शस्त्र) पूजा
– शमी पूजन व सीमोल्लंघन- (अशोकवनात व गडाच्या पूर्व तटावरती)
– अध्यक्ष व अधिकारी स्वामी यांच्या हस्ते गावकऱ्यांना पानसुपारी
– रात्री अंगाई देवी मंदिरात भजन व पालखी सोहळा (श्रीअंगाई देवी मंदिर ते श्रीसमर्थ समाधी मंदिर व परत)
– अंगाई देवी मंदिरात जागरण व गोंधळ

२४. कोजागिरी (अश्विन पौर्णिमा)

– श्रीअंगाई देवी मंदिरात संप्रदायिक भजन सेवा
– समस्त गावकऱ्यांना व भाविकांना दुध प्रसाद

२५. वसुबारस (अश्विन कृ.द्वादशी)

– गो पूजन – संस्थानच्या गो शाळेतील गो मातेचे पूजन

२६. धनत्रयोदशी (अश्विन कृ. त्रयोदशी)

– धन्वंतरी पूजन – संस्थानच्या आरोग्य सेवा केंद्रातील धन्वंतरीचे पूजन
– निवासी यात्रेकरू व समस्त गावकरी यांना तेल व उटणे वाटप.

२७. नरक चतुर्दशी (अश्विन कृ.चतुर्दशी)

– श्रीसमर्थ समाधीस अभ्यंग स्नान
– रात्री श्रीसमर्थ समाधी मंदिरात भजन सेवा

२८. लक्ष्मीपूजन (अश्विन अमावस्या)

– लक्ष्मी पूजन

२९. आक्कास्वामी पुण्यतिथी (कार्तिक शु.प्रतिपदा)

– दिपपूजन
– श्रीसमर्थ स्त्री शिष्या आक्कास्वामी (ज्यांनी श्रीसमर्थांच्या पश्चात १६८९ ते १७१० पर्यत सज्जनगडची व संप्रदायाची धुरा वाहिली.) यांच्या समाधी वृंदावनास अभिषेक.

३०. तुळशी विवाह (कार्तिक शु.द्वादशी)

३१. वैकुंठ चतुर्दशी (कार्तिक शु.चतुर्दशी)

सज्जनगड पंचक्रोशीतील गावकऱ्यांची श्रीसमर्थ समाधी मंदिरात भजन सेवा

३२. त्रिपुरारी पौर्णिमा (कार्तिक शु.पौर्णिमा)

श्रीसमर्थ समाधी मंदिरात संप्रदायिक भजन व गडप्रदक्षिणा, दीप प्रज्वलन

३३. देव दिवाळी (मार्गशीर्ष शु.प्रतिपदा)

श्रीराम मंदिरात मार्तंडभैरव उत्सवारंभ

३४. चंपाषष्ठी (मार्गशीर्ष शु.षष्ठी)

– श्रीसमर्थ पादुका प्रचार दौरा प्रस्थान
– मार्तंड भैरव नवरात्रोत्थापन

३५. दत्तजयंती (मार्गशीर्ष शु.पौर्णिमा)

अशोकवनातील दत्तमंदिरात पूजा, रुद्रानुष्ठान जन्मकाळ

३६. मकरसंक्रांती

– सज्जनगड पंचक्रोशीतील सुवासिनी श्रीसमर्थ स्थापित श्रीराम पंचायानातील सीता मातेला हळदी, कुंकू, सुगड समर्पण करण्यासाठी सज्जनगडावर येतात.
– सायंकाळी अध्यक्ष व अधिकारी स्वामी यांचे हस्ते समस्त गावकऱ्याना तीळगुळ वाटप.

३७. रथसप्तमी (माघ शु.सप्तमी)

– सूर्य देवता पूजन

३८. उद्वार्चन (माघ शु.पौर्णिमा)

– श्रीसमर्थ पूजित श्रीराम पंचायतनास पवमान अभिषेक सकाळी ८-०० वा.
– श्रीसमर्थ स्थापित राम पंचायतन मूर्तीना पिठीसाखर लावून स्नान घातले जाते.
– श्रीसमर्थ समाधी पूजन – सकाळी १०-०० वा.

३९. दासनवमी महोत्सव प्रारंभ (माघ कृ. प्रतिपदा)

– महोत्सवाची मुहूर्तमेढ पूजन
– ध्वज पूजन
– अग्नी पूजन
– कोठी पूजन
– श्रीमत् ग्रंथराज दासबोध पारायण (प्रतिदिनात्मक) – ९ दिवसात ९ पारायण
– अन्नपूर्णा पूजन

दासनवमी उत्सवातील दैनंदीन कार्यक्रम

१. काकड आरती
२. श्रीसमर्थ समाधी महापूजा
३. प्रवचन सेवा
४. भजन सेवा
५. छबीना (पालखी) – श्रीसमर्थ समाधी मंदिर ते पेठेतील मारुती मंदिर व परत
६. श्रीसमर्थ रचित आरत्या म्हणत मंदिरास १३ प्रदक्षिणा
७. सुंदरकांड अध्यात्म रामायण पुराण सेवा
८. भाविकांना महाप्रसाद
९. गायन, वादन सेवा
१०. नित्योपासना
११. देवतांची दृष्ट काढणे
१२. सायं आरती, छबिना , श्रीमत् ग्रंथराज दासबोध वाचन
१३. श्रीमत् ग्रंथराज दासबोध आरती
१४. कीर्तन सेवा
१५. मानकरी विडा वाटप

दासनवमी उत्सवातील विशेष कार्यक्रम

१. श्रीसमर्थ स्थापित श्री अंगाई मंदिरात देवी पूजन
२. अध्यक्ष व अधिकारी स्वामी आणि करंडी ग्रामस्थ संप्रदायिक भजन (माघ कृ. सप्तमी)
३. संतपूजा , भजन करीत मंदिरास १३ प्रदक्षिणा (माघ कृ. अष्टमी)
४. निनाम पाडळी, डोळेगाव व अंगापूर. सासन काठ्या पूजन (माघ कृ.अष्टमी)
५. दासनवमी माघ कृ. नवमी) विशेष
६. संप्रदायिक भिक्षा
– श्रीराम व श्रीसमर्थ समाधी मंदिरामागील ओवरीतील श्रीमत् ग्रंथराज दासबोध पारायण सांगता.
– श्रीसमर्थ निर्याण कथा
– हजारो भाविकांना महाप्रसाद

४१. लळीत (माघ कृ. दशमी) दासनवमी उत्सवाची सांगता

– लळीत कीर्तन (रामराज्य अभिषेक आधारित)
– दासनवमी उत्सवातील सर्व मानकरी, सेवेकरी यांना दरबारात मा. अध्यक्ष व अधिकारी स्वामी यांचे हस्ते श्रीसमर्थ प्रसाद वाटप

४२. महाशिवरात्री (माघ कृ. त्रयोदशी)

– संस्थानच्या वतीने परळी येथील पांडवकालीन केदारनाथास रुद्राभिषेक
– श्रीसमर्थशिष्य कल्याणस्वामी यांच्या चरण पदुकांसाहित डोमगाव येथील मठपती कल्याणस्वामी यांनी घालून दिलेल्या परंपरेनुसार सज्जनगडाला प्रदक्षिणा घालतात. त्यांना परळी येथे जाऊन श्रीसमर्थ समाधी तीर्थ, गंध, प्रसाद वाटप केला जातो.

४३. होळी (फाल्गुन शु. पौर्णिमा)

अशोकवनात होलिका पूजन

४४. रंगपंचमी (फाल्गुन कृ. पंचमी)

श्रीसमर्थ समाधीस केशर स्नान

४५. उद्वार्चन (फाल्गुन कृ. अमावस्या)

– श्रीसमर्थ पूजित श्रीराम पंचायतनास पवमान अभिषेक सकाळी ८-०० वा.
– श्रीसमर्थ स्थापित राम पंचायतन मूर्तीना पिठीसाखर लावून स्नान घातले जाते.
– श्रीसमर्थ समाधी पूजन – सकाळी १०-०० वा.

rss-contact-bottom-img
Language