संस्थान

सदुपासना सत्कर्म । सत्क्रिया आणि स्वधर्म ।
सत्संग आणि नित्यनेम । निरंतर ।।

rss-hero-content-bottom-img
vyav-home-img

निवास व्यवस्था

  1. श्रीसमर्थ समाधी मंदिर परिसरातच समर्थ भक्तांसाठी दोन निवासी इमारती आहेत . मंदिर परिसरातच निवास व्यवस्था असल्याने भक्तांना मंदिरातील कार्यक्रमांना वेळेवर उपस्थित राहून आनंद घेता येतो.
  2. प्रत्येक खोलीत स्वतंत्र स्नानगृह व स्वच्छतागृह ( भारतीय/ पाश्चात्य ) आहे.
  3. गरम पाण्याची व्यवस्था आहे.
  4. निवास व्यवस्था विनामूल्य आहे. सकाळी ६ वा.चहा , सकाळी ९-३० वा नाष्टा , दुपारी व रात्री भोजनप्रसाद या सर्व व्यवस्था विनामूल्य आहेत.
  5. खोलीत पंखा , एक कॉट , गाद्या / पांघरून इ.उपलब्ध आहे.
  6. एक दिवस निवासाची व्यवस्था होते. पूर्व नोंदणी होत नाही. तथापि पूर्व सूचना दिल्यास गैरसोय होणार नाही.
  7. निवासासाठी ओळखपत्र उदा. आधार कार्ड / पॅन कार्ड / पासपोर्ट / ड्रायव्हिंग लायसन्स या पैकी एक आवश्यक लग्नामुळे आडनावात बदल असल्यास विवाह नोंदणी दाखला आवश्यक
  8. सज्जनगड हे पर्यटन स्थळ नाही. धार्मिक स्थळ आहे त्यास साजेसा पेहराव आणि वर्तन असावे.
  9. धार्मिक स्थळ असल्याने श्रीसमर्थ समाधी मंदिरात होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमात उपस्थित राहून मानसिक शांतता आणि श्रीसमर्थांची कृपा अनुभवावी
rss-contact-bottom-img
Language