rss-swami-home-img
home-slider-bg-01

सह्याद्रिगिरीचा विभाग विलसें मंदारशृंगापरी ।
नामें सज्जन जो नृपें वसविला श्रीउर्वशीचें तिरी ।
साकेताधिपती कपि भगवती हें देव ज्याचे शिरीं ।
येथें जागृत रामदास विलसें जो या जनां उध्दरी ।।

rss-hero-content-bottom-img

३७३ वर्षांची परंपरा व इतिहास

श्रीसमर्थ रामदासस्वामींनी प्रपंच आणि परमार्थ यांची सांगड घालून कर्मनिष्ठा व चातुर्याचे महत्व प्रतिपादन केले. समाजाच्या उन्नतीसाठी विरक्त कार्यकर्त्यांची उणीव श्रीसमर्थांना जाणवली. श्रीसमर्थांना अभिप्रेत असलेला विरक्त हा केवळ वैयक्तिक परमार्थ करणारा नसून, तो कर्तबगार व समाज कार्यासाठी सतत झटणारा असा होता. अशा निष्ठावान कार्यकर्त्यांची संघटना समाजात जागृती निर्माण करेल, असा श्रीसमर्थांचा विश्वास होता.

श्रीसमर्थांनी इ.स. १६४४ मध्ये शहापूर (जि.सातारा) येथे पहिला मारुती स्थापन करून रामदासी संप्रदायाची मुहूर्तमेढ रोवली. इ.स. १६४८ मध्ये चाफळ येथे मठाची स्थापना करून संप्रदायाला संघटनेचे स्वरूप दिले. अशा रितीने रामदासी संप्रदायासाठी संस्थानची स्थापना इ.स. १६४८ मध्ये श्रीरामदासस्वामींनीच केली व हेच संस्थान श्रीरामदासस्वामी संस्थान म्हणून ओळखले जाऊ लागले.

about-bottom-img
श्रीदासबोध अभ्यास शिबिर
दि.१० मे ते दि.१२ मे २०२४
रामदासी कीर्तन शिबिर
दि.१४ मे ते दि.१९ मे २०२४
dasnawami-up-img

विशेष सूचना

ramdasswami-logo-png

lram_Xmgñdm_r g§ñWmZ gÁOZJS>

सज्जनगडावरील निवास व्यवस्था सोमवार, दि. २५ ऑक्टोबर २०२१ पासून सुरू झालेली आहे. निवासासाठी खालील अर्ज भरणे अनिवार्य आहे. खालील लिंकवर क्लिक करून अर्जाची PDF डाऊनलोड करावी. सदर अर्ज प्रिंट करून, तो सुवाच्य अक्षरात भरून अर्जाचा फोटो संस्थानच्या ९४२३०३४११२ या व्हॉट्सऍप क्रमांकावर पाठवावा. अधिक माहितीसाठी अर्जातील नियमावली वाचावी अथवा सज्जनगड ऑफिसशी संपर्क साधावा.
Language