सह्याद्रिगिरीचा विभाग विलसें मंदारशृंगापरी ।
नामें सज्जन जो नृपें वसविला श्रीउर्वशीचें तिरी ।
साकेताधिपती कपि भगवती हें देव ज्याचे शिरीं ।
येथें जागृत रामदास विलसें जो या जनां उध्दरी ।।
श्रीसमर्थ रामदासस्वामींनी प्रपंच आणि परमार्थ यांची सांगड घालून कर्मनिष्ठा व चातुर्याचे महत्व प्रतिपादन केले. समाजाच्या उन्नतीसाठी विरक्त कार्यकर्त्यांची उणीव श्रीसमर्थांना जाणवली. श्रीसमर्थांना अभिप्रेत असलेला विरक्त हा केवळ वैयक्तिक परमार्थ करणारा नसून, तो कर्तबगार व समाज कार्यासाठी सतत झटणारा असा होता. अशा निष्ठावान कार्यकर्त्यांची संघटना समाजात जागृती निर्माण करेल, असा श्रीसमर्थांचा विश्वास होता.
श्रीसमर्थांनी इ.स. १६४४ मध्ये शहापूर (जि.सातारा) येथे पहिला मारुती स्थापन करून रामदासी संप्रदायाची मुहूर्तमेढ रोवली. इ.स. १६४८ मध्ये चाफळ येथे मठाची स्थापना करून संप्रदायाला संघटनेचे स्वरूप दिले. अशा रितीने रामदासी संप्रदायासाठी संस्थानची स्थापना इ.स. १६४८ मध्ये श्रीरामदासस्वामींनीच केली व हेच संस्थान श्रीरामदासस्वामी संस्थान म्हणून ओळखले जाऊ लागले.
लवकरच माहिती प्रकाशित करण्यात येईल
सर्व्हे नं. १३७/४, प्लॉट नं-१,२,३
बसप्पा पेठ, करंजे तर्फ, सातारा ४१५००२
संपर्क – +९१ २१६२ – २३० ४०१
पहाटे ५ – काकड आरती
सकाळी ७.३० – श्रीराम व श्रीसमर्थ समाधी पूजा
सकाळी ८.४० – आरती
दुपारी १२ – महाप्रसाद
सायंकाळी ६ – नित्य उपासना
सायंकाळी ७.३० – आरती
रात्रौ ८ – दासबोध वाचन व शेजारती
© 2025 Shri Ramdasswami Sansthan Sajjangad. All Rights Reserved.
Maintained by SWIFT designs