शिबिर

शाहाणे करावे जन। पतित करावें पावन।
सृष्टीमध्ये भगवद्भजन। वाढवावे।।

rss-hero-content-bottom-img

रामदासी कीर्तन शिबिर

वय मर्यादा : १५ ते ४० वर्षे
पुरुष - पांढरा कुर्ता/बंडी व पायजमा
महिला - पांढरी सलवार, पांढरी कुर्ती व ओढ

नियम व सूचना :

  1. शिबिरात सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या शिबिरार्थींना या ऑनलाईन पूर्वप्रवेश प्रक्रियेद्वारे नोंदणी करणे अत्यावश्यक. नोंदणी न केलेल्या इच्छुकांना प्रवेश देण्यात येणार नाही.
  2. नोंदणीनंतर प्रवेश निश्चित झालेल्या शिबिरार्थींना गडावरून संपर्क साधला जाईल. कृपया संपर्क झालेल्यानंतरच आपला प्रवेश निश्चित समजावा. काही आजार वगैरे असल्यास कृपया शिबिरात सहभागी होऊ नये. गडाच्या भौगोलिक परिस्थितीनुसार गडावर वैद्यकीय सेवेची त्वरित उपलब्धता नाही याची कृपया नोंद घ्यावी.
  3. सर्व शिबिरार्थींनी दिनांक १३ मे रोजी सायंकाळी ४ पर्यंत गडावर पोचावे.
  4. सर्व शिबिरार्थींनी निवास व भोजनव्यवस्थेच्या संदर्भाने संस्थानतर्फे करण्यात येणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे.
  5. कृपया पांघरूण, शाल, वही पेन, नियमित औषधे सोबत आणावीत. कीर्तन शिबिराच्या समारोपास श्रीसमर्थ समाधी समोर प्रात्यक्षिक कीर्तन करण्याची संधी शिबिरार्थींना उपलब्ध करून देण्यात येते. त्यामुळे कृपया पूर्ण कीर्तनी पोशाख ही सोबत असणे आवश्यक आहे.
  6. शिबिरात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या शिबिरार्थींना वक्तृत्व, वाद्यवादन, गायन, रागांचे किमान ज्ञान असणे आवश्यक आहे.
  7. सज्जनगड हे पर्यटनस्थळ नसून अध्यात्मिक केंद्र आहे. आपण समर्थभक्त साधक आहोत, यास अनुरूप आचरण असावे. सज्जनगडाच्या अध्यात्मिक पावित्र्याची सर्वांकडून जपणूक व्हावी
Language